नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. तरी सुद्धा मंगळवारी झालेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मंत्री आणि आमदारांनी बिना मास्क उपस्थिती लावली होती.
अधिवेशनात सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री उषा ठाकूर यांनी देखील विनामास्क उपस्थिती लावली. त्यानंतर नियमांचं उल्लंघन केल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत त्या रोज हनुमान चालीसाचं पठन करतात. शंक फुकणं, काढा पिणं, शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करणं यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोनापासून बचाव होतो आणि या गोष्टी करत असल्याचं उषा ठाकूर यांनी सांगितलं आहे. तसेच त्या गळ्यात गमला घालतात आणि जर कोणी जवळ आलं तर तो त्या तोंडावर ठेवतात, असं त्यांनी म्हटलं.
उत्तम मार्गाने ज्याला या जगात जगायचं आहे. त्याने वैदिक जीवनशैली अंगिकारली पाहिजे, असंही उषा ठाकूर यांनी म्हटलंय.
दरम्यान,बसपाच्या आमदार रमाबाई परिहार याही मास्क न लावता विधानसभेत दाखल झाल्या होत्या. यावेळी ज्याच्यात धैर्य आहे, केवळ तोच काहीतरी करू शकतो. मास्क न लावल्याबद्दल जो काही दंड असेल तो मी भरेन. मास्क लावल्याने मला घाबरल्यासारखं होतं, असं रमाबाई परिहार म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतने शेअर केले ग्लॅमरस फोटो; फोटो पाहून चाहते झाले फिदा
तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र, वाचा जसेच्या तसे
‘PI लगडला चालवणारा बाप कोण ते आम्ही शोधून काढू’; चित्रा वाघ आक्रमक
“जो कोणी चुकला असेल त्याला क्षमा करणार नाही”
पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीची चित्रा वाघ यांनी केली पाहणी!
Comments are closed.