बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाटगा जास्त कोडगा असतो, नारायण राणे हे लाचार नेते”

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर केलेल्या आरोपांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यातच आता शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला.

शिवसेनेनं नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं असलं तरी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही शिवसेनेचा नेता म्हटलं नाही. त्यांची नेता होण्याची लायकी नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आणि आता भाजपमध्ये पाठीमागच्या दाराने जाऊन चोरपावलांनी दिल्लीहून परतणाऱ्यांनी सगळ्या पक्षांशी बेईमानी केली आहे, अशी जोरदार टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

एक म्हण आठवते, बाटगा जास्त कोटगा असतो, सगळ्या पक्षांतून जाणारे नारायण राणे हे लाचार नेते आहेत. त्यामुळे ते आक्रस्ताळेपणा करत आहेत. आता त्यांचा सर्वप्रकारचा आक्रस्ताळेपणा करून झाला आहे, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे. नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, नारायण राणे लाचारीने बोलत आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असेल तरी कोरोनाच्या काळामध्ये संपुर्ण देशवासीयांनी उद्धव ठाकरे यांचा आदर्श मुख्यमंत्री म्हणून गौरव केल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. नारायण राणे आज आमच्यावर टीका करत आहेत. किरीट सोमय्यांनीच एकवेळी त्यांच्यावर आरोपांची मालिका लावली होती, असं विनायक राऊत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-  

“संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, सगळी कुंडली बाहेर काढीन”

“एक स्वतंत्र राष्ट्र खलिस्तानचा पंतप्रधान…”; कुमार विश्वास यांच्या आरोपाने राजकारणात खळबळ

“उद्धवजींना एकच सांगू इच्छितोे की, संजय राऊत तुम्हाला घेऊन एकदिवशी नक्कीच डूबणार”

एका रात्रीचे किती घेतेस विचारणाऱ्याला मुनमुन दत्ताने झाप झापलं, म्हणाली…

पॅन कार्ड हरवताच केवीन पीटरसनची मदतीसाठी पंतप्रधान मोदींकडे धाव, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More