मुंबई | “मी माझा जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी सर्व करत आहे. सरकारला काय बोलायचं?, काय सांगायचं? मी आता बोलून बोलून थकलो आहे. सरकारने ताबडतोब पावले उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे”. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
“”मला आश्चर्य वाटतेय, मी काल, परवा, अनेक दिवसांपासून बोलतोय फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेच आहे. मी हे देखील सांगितले होते की सामान्य डिपार्टमेंन्ट जे आहे त्यांच्या सचिवांना कोऑर्डिनेट करायला सांगा. याबाबतीत माझं बोलणं अशोक चव्हाणांशी झालं होतं की उपसमितीची मिटिंग लावा. पण ती मिटिंगही झालेली दिसत नसल्याचं,” संभाजीराजेंनी सांगितलं.
“सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्याला विचारतात की, कुठे आहेत सरकारी वकील, तेव्हा ते तेथे उपस्थित नसतात. आपले सरकारी वकील तेथे उपस्थित नव्हते हे आपले दुर्दैव असल्याचेही” संभाजीराजेंनी सांगितले आहे.
तसेच मराठा समाजाला तुम्ही अशा पद्धतीने गृहीत धरायला लागेल आहात का?, असा सवालही संभाजीराजेंनी सरकारला विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
नितीश कुमार शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेत; तेजस्वी यादव यांचा टोला
पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल; ‘या’ खासदाराने व्यक्त केली खदखद
‘…असं सरसंघचालक मोहन भागवत कधीच सांगणार नाहीत- शिवसेना
योग्य वेळ आली की शिवसैनिकच नारायण राणेंना उत्तर देतील- अशोक चव्हाण