बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी माणसांच्या जंगलातले 2 खरे वाघ पाहिलेत, एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे…”

मुंबई | आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजेच हेमांगी कवी-धुमाळ. हेमांगीनं मराठी-हिंदी मालिका, नाटक, आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशातच हेमांगी सोशल मीडियावर तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असते. आता पुन्हा एकदा तिच्या पोस्टनं सोशल मीडियावर लक्ष वेधलं आहे.

सध्या मराठी चित्रपट धर्मवीरचा बोलबाला सुरु आहे. या चित्रपटाविषयी लिहिताना हेमांगीनं पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटासाठी प्रसाद ओकनं केलेल्या मेहनतीसाठी आणि आनंद दिघेंच्या कामाविषयी हेमांगीनं ही कौतुकास्पद पोस्ट लिहिली आहे.

ज्यांच्या वर हा biopic आहे ते आमच्या ठाणे जिल्ह्याचे वाघ ‘आनंद दिघे साहेब’. फार कमी लोकं आहेत ज्यांना आतून, मनातून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं. मी आजपर्यंत प्रत्यक्षात कधीच जंगलातला वाघ पाहिला नाहीए पण मी मुंबई आणि ठाणे या माणसांच्या जंगलातले 2 खरे वाघ पाहिलेत…एक मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे मा. श्री आनंद दिघे साहेब!, असंही हेमांगी म्हणाली.

दरम्यान, हेमांगी कवीच्या या पोस्टवर सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

रशियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा; पुतिन यांचा ‘या’ देशाला गंभीर इशारा

राज्यात ‘या’ भागात तीव्र उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा इशारा

मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाचा दिलासा

पुणे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

“…तर तुम्हाला देखील याच कबरीत जावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More