बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी फोटो पाहिलेत, हात बांधून कोणी आत्महत्या करत नाही”

मुंबई | मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मनसुफ हिरेन असं त्यांच नाव असून त्यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून देवेंद्र फडणवीसांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. “मी मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही”, असं फडणवीस म्हणाले.

मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली असल्याचं म्हटलं आहे. गाडीचं स्टेअरिंग जॅम झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही, असं सांगत फडणवीसांनी आक्षेप घेतला आहे.

अनिल देशमुख यांनी यावेळी फडणवीसांना त्यांच्याकडे असणारी सर्व माहिती आपल्याकडे द्यावी अशी विनंती केली. नंतर बोलताना त्यांनी सचिन वाझे यांनी तुमच्या अर्णब गोस्वामीला आत टाकलं म्हणून तुमचा राग आहे का त्यांच्यावर? अशी विचारणा केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घातला.

दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन सादर केलं असून मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. पोलीस तपास करत असून शवविच्छेदन करण्यात येत आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

थोजक्यात बातम्या – 

आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत पदवीधारकांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं- संजय राऊत

शाळेत जाण्यासाठी आईने केली बळजबरी, मुलाने केली पालकांचीच हत्या

धक्कादायक! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं असलेल्या कारमालकाचा संशयास्पद मृत्यू

धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली – पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More