बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मी राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज मुंबई महानगर प्रदेशमधील वाहतूक व्यवस्थेशीसंबंधित एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी मुंबई महानगर प्रदेशमधील भविष्यातील वाहतूक आराखडा यावर चर्चा करण्यात आली. यावेळी एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी वाहतूकीच्या प्रकल्पांबाबात तसंच भविष्यातील प्रकल्पांबाबत सादरीकरणे केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबई महानगर वाहतूक संदर्भात भाषण केलं.

कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्याच संवादचा धागा उचलत ठाकरे यांनी कार्यक्रमात भाषण केलं. अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो. परंतु मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे. तसेच कर्तव्य पार पाडताना राजकारण करू नये, तसंच मी कधीही अशा कामात राजकारण येऊ देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

जगात अनेक सुविधा सुरू होतात. ज्या इथे नसतात. परंतु स्वयंचलित लोकल सेवा ही याआधीच आपल्याकडे आहे. प्लॅटफॉर्मवरून लोकलमध्ये ऑटोमेटिक चढणे आणि स्टेशन आल्यावर तसंच ऑटोमेटिक उतरणे हे जगात कुठेही नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील 30-35 वर्षांपूर्वी बस आणि लोकलने केलेल्या प्रवासाच्या आठवणी देखील सांगून दाखवल्या. कोरोनामुळे लोकल सेवा बऱ्याच दिवस बंद होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लोकल सेवा मुंबईकरांनासाठी सुरू करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…मग विराट कोहलीला अटक करणार का?”

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत:… – गोपीचंद पडळकर

राज्यातील ‘लाल परी’ वाहतूक बंद; एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची ‘इतक्या’ जागांसाठी जम्बो पदभरती

मी भाजप पुरस्कृत असतो तर… – खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More