बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं, मी अंघोळ करता करता…”

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या निवडणुकीत भाजपने सरशी मारली आहे.  भाजपच्या विठ्ठल देसाई आणि शिवसेनेच्या सतीश सावतं यांना समान मत पडली होती. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीच्या साहाय्याने हा निकाल लावण्यात आला आहे. यावेळी विजयानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी विजयी झालेल्या नेत्यांशी गप्पा मारल्या.

नारायण राणे यांनी गप्पा मारताना विठ्ठल देसाई यांनी चिमटा काढला आहे. जिकंलास ,खरं वाटतंय का? असा प्रश्न नारायण राणेंनी विठ्ठल देसाई यांना विचारला. पुढे ते म्हणालेस नशीब ए हा नशिब, चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठं नशिब, तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी अंघोळ करता करता थांबलो, अशी कोपरखळीही नारायण राणेंनी यावेळी काढली आहे.

नारायण राणेंनी यावेळी नितेश राणेंविरोधात मुंबईत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर प्रतिक्रिया दिली. हे फक्त पोस्टर लावायच्याचं लायकीचे आहेत. राज्यकारभार करायच्या लायकीचे नाहीत. आता त्यांनी हातात गम घेऊन पोस्टर लावतचं फिरावं, असा खोचक टोला राणेंनी लगावला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सतीश सावतं आणि विठ्ठल देसाई यांना समान मते पडली होती. त्यामुळे एका शालेय विध्यार्थ्यांच्या हाताने चिठ्ठी काढत निकाल लावण्यात आला. विद्यार्थ्याने विठ्ठल देसाई यांच्या नावाची चिठ्ठी बाहेर काढल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

थोडक्यात बातम्या-

माझी ‘परफेक्ट वाईफ’ म्हणत रितेशने शेअर केला जेनेलियाचा व्हिडीओ

“सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो, देवांक…”, आशिष शेलारांचं मालवणी भाषेत ट्विट

“भाजपचा कार्यकर्ता ‘अरे ला, का रे’ करायला घाबरणार नाही”

“कारस्थान करून निवडणूक जिकंता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण…”

धक्कादायक! Omicronमुळे देशात दोन बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More