बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की…”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यातच आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर व्हावं लागणार आहे. अशातच अनिल परब यांनी चौकशीसाठी जाण्यापूर्वी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडी चौकशीला जाण्यापूर्वी अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो की मी काही चुकीचं केलेलं नाही. यामागेही मी हेच सांगितलं होतं आणि आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरा समन्स आल्यानं मी ईडीच्या चौकशीला सामोरं जात आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, आपल्याला ईडीनं का बोलावलं आहे याची माहिती नाही. मात्र या चौकशीदरम्यान जे काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं मी देणार आहे. त्यांच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. चौकशीला गेल्यावर कळेल की नेमकं कशासाठी बोलावलं आहे.

दरम्यान, सचिन वाझे यांनी केलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांची चौकशी होणार आहे. चौकशीमुळे सध्या पोलिसांनीही ईडी कार्यालयाच्या बाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

थोडक्यात बातम्या – 

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

चालकाच्या धाडसाने प्रवाशांचा जीव धोक्यात, पुलावरून जाताना एसटी कोसळली; पाहा व्हिडीओ

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहा व्हिडीओ

तळीरामांचे वांदे! लस घेतली तरचं मिळणार दारू; ‘या’ जिल्ह्यात राबवली भन्नाट कल्पना

“संजय राऊतांनी ईडीला तब्बल 55 लाख रूपये दिले, अडसूळांनी राऊतांकडून काहीतरी शिकावं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More