बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो, माझी जबाबदारी आहे”

औरंगाबाद | मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो. त्यामुळे या प्रकरणात माझी जबाबदारी आहे. जशी माझी जबाबदारी आहे तशीच सगळ्या खासदारांचीही आहे, असं म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी इतर खासदारांवर निशाणा साधला आहे.

मूक आंदोलन आम्ही थांबवलेत, बंद केलेले नाहीत. मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो, मग माझी जबाबदारी नाही का? जशी माझी जबाबदारी तशी सगळ्याच लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे. इतर सर्व लोकप्रतिनिधींनी देखील ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन संभाजीराजेेंनी केलंय.

आरक्षण मिळेल अथवा न मिळेल तोपर्यंत सारथी घेऊ ना आपण. दरवेळी परवानगीसाठी अजित पवारांकडे का जायचं? त्यासाठी सारथीला स्वायत्तता मिळवली. सारथीचं बजेट 500 कोटींच्या खाली नसलं पाहिजे. सारथीचं विभागीय उपकेंद्र पाहिलं. 5 दिवसात तिथे उद्घाटन केलं. औरंगाबादला पण उपकेंद्र सुरू झालं पाहिजे. मी सुद्धा वेरुळचा, मराठवाड्यातला आहे. शिवाजी महाराजांचे वडील वेरुळचे होते. त्यामुळे पहिला मान मराठवाड्याला, असंही  संभाजीराजेंनी सांगितलं.

दरम्यान, कुणाल वाटलं मी मॅनेज झालो. अहो मी छत्रपती शिवाजी आणि शाहूंच्या घरात माझा जन्म झालाय. मॅनेज होणं माझ्या रक्तात नाही. केंद्राने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी. केंद्राने मागासवर्गीय आयोग नेमून समाजाला न्याय द्यावा, असं खासदार संभाजीराजे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच सत्य आहे”

“भाजपच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा”

संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर नाना पटोले म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

‘शरद पवारांनी केंद्राला कोणताही सल्ला दिलेला नाही, दिशाभूल करण्यात आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More