बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ मला वाटतं लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा बोगसपणा’

अहमदनगर | कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण झालं आहे. ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधही लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी लाॅकडाऊन आणि नाईट कर्फ्यूबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31st साठी पार्टीचं (31st Party) आयोजन करत आहेत. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पार्ट्यांवर बंदी लावण्यात येणार असल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी निर्बंधही जारी केले आहेत. ‘मला वाटतं लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा बोगसपणा आहे. याची काहीही आवश्यकता नाही. सर्वांनी स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारून सुरक्षित राहणे आणि कोरोना लसीकरण घेणे हाच एकमेव उपाय आहे. बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे मी समर्थन करत नाही’, असं सुजय विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

लग्न-समारंभावर उपजीविका असणारे अनेक कामगार असतात. त्यांनाही मुलंबाळं असतात. लॉकडाऊन करण्यात आला तर त्यांना कोण खाऊ घालणार?, असा प्रश्नही यावेळी सुजय विखे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नवीन वर्षाची सुरवात होत असली तरी कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम जारी केले आहेत. नागरिकांनी या नियमांचे पालन करावं असं आवाहनही सरकारकून केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या  – 

पोस्टरबाजी: “नितेश राणे हरवला आहे, शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’; रोहित पवारांची MPSCला विनंती

मोठा झटका! Quinton de Kockची अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

MARD Doctor Strike: कोरोनाचं सावट घोंगावत असताना डाॅक्टरांचा आजपासून संप

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More