मुंबई | नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात सापडणारा अभिनेता म्हणजे कमाल आर खान. तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात किंवा आरोपांच्या मालिकेत पहायला मिळतो. अशातच कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पहायला मिळत आहे.
कमाल खाननं एक ट्विट केलं आहे ते ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये केआरकेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर काॅंग्रेसलाही खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
काही दिवासांपू्र्वी माझा ‘देशद्रोही’ चित्रपट प्रदर्शीत होणार होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी तो चित्रपट पाहिला होता. त्यांनी मला एक दोन सीन काढून टाका नाहीतर चित्रपटावर बंदी आणू, असं सांगितलं होतं. पण मी त्यांना नकार दिला. मला वाटलं राज ठाकरे हे करुच शकत नाही पण त्यांनी हे केलं. कारण तेव्हा काॅंग्रेसची सत्ता होती मात्र दोन दिवसांत त्यांनी हे केलंही, असं ट्विट केआरकेनं केलं आहे.
दरम्यान, केआरकेचं हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रियाही यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे केआरकेचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Few days before the release of my film #DeshDrohi #RajThackeray Sahab asked me to delete few scenes and I refused. Then Raj Saab told me that he will put ban on my film in Maharashtra n he did that within 2days. I was thinking that he can’t do that coz Congress was ruling state.
— KRK (@kamaalrkhan) March 15, 2022
थोडक्यात बातम्या –
‘काही पक्षांचे विचार एक्सपायर झाले आहेत तरी…’; भाजपचा हल्लाबोल
“… त्यानंतर नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधानपद सोडतील”
‘भाडे दिले नाही तर…’; भाडेकरुसांठी सर्वोच्च न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय
‘सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा…’; भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
‘रशियाला 10 दिवस युद्ध थांबवावं लागेल’; माजी लष्कर अधिकाऱ्यानं सांगितलं कारण
Comments are closed.