बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”मी माझ्या घरच्यांना सांगितलंय माझे कपडे लाॅन्ड्रीत टाकू नका, नाहीतर…”

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोमय्यांनी 11 मंत्र्यांची यादी जाहीर करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर काल सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. त्यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या आरोपांवरून भाजपला चांगलंच फटकारलं आहे.

राज्यातील सरकार घाबरलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. मी तर आता जेमतेम घाबरलोच आहे. चंद्रकांत पाटलांचे ईडी आणि सीबीआयचे लोक माझ्यावर कधी झडप घालायला येतील सांगता येत नाही, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला आहे.

ईडी आणि सीबीआय या भाजपच्या दोन शाखा आहेत. मला माझे कपडे आता लाॅन्ड्रीमध्ये धुवायला टाकण्याची भीती वाटते. भाजपवाले माझ्यावर कधी मनी लाॅन्ड्रींगची केस करतील सांगता येत नाही. मी माझ्या घरच्यांना सांगितलंय की माझे कपडे लाॅन्ड्रीमध्ये धुवायला टाकू नका नाहीतर भाजपवाले माझ्यावर केस करतील, असं म्हणत राऊतांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील काही मंत्र्यांवर चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. सोमय्यांनी राज्यातील मंत्र्यांवर केलेल्या आरोपांविषयी संजय राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

थो़डक्यात बातम्या –

काय सांगता! हाताला काम नसल्यानं तरूणांनी सुरू केला चक्क नोटांचा छापखाना

मोठी बातमी! याॅकर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

बाप्पासोबत लाखो रुपयांच्या मुकूटाचंही पाण्यात विसर्जन, लक्षात आल्यानंतर….

…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे – विजय वडेट्टीवार

‘…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही’; ‘या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More