बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी 50 लाख रुपये पाॅलिथीन बॅगेतून घेतले आणि…’; प्रभाकर साईलचा मोठा खुलासा

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होत असून अनेक नवीन व्यक्ती समोर येत आहे. अशातच किरण गोसावीचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईल यांनी किरणने आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटी रुपयांची डील केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यानंतर आता त्याने आणखीन एक खुलासा केला असून मी सर्व काही बाहेर काढणार असल्याचं प्रभाकरने म्हटलं आहे.

22 जुलैला ड्यूटी वर जाॅईन झालो होते. मी 50 लाख रुपये पाॅलिथीन बॅगेतून घरी नेले. ड्यूटीवर जाॅईन झाल्यानंतर आपल्या मित्राच्या अकाऊंटवर 5000 आले आणि नंतर प्रभाकरच्या अकाऊंटवर 10,000 आल्याची माहिती प्रभाकर साईलने दिली. या डीलशी आपला काही संबंध नसून कोणीही कसलंच आमिष देखील दाखवलं नसल्याचं प्रभाकरने म्हटलं आहे.

राहत्या घरी पोलीस येत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मला मुंबईला घेऊन गेले तेव्हा मी सगळं सत्य सांगितलं, असं देखील प्रभाकर साईलने सांगितलं. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मी माझ्या मित्राकडे मदतीची विनंती केली त्यावेळी मीडियाला सर्व सत्य पुराव्यांसह सांगण्याचा सल्ला मित्राने दिला असून मी सगळं काही समोर आणणार असल्याचं प्रभाकरने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More