बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला सेक्स करायला जाण्यासाठी ई-पास हवाय; तरुणाच्या अर्जाने पोलीस हैराण

तिरुवनंतपुरम | देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे. तसेच आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पास देखील बंधनकारक करण्यात आला आहे.

प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्यानंतर नागरिकांनी विविध कारणे देऊन ई-पासला अर्ज करायला सुरुवात केली. त्यातील काही कारणे तर शुल्लक आणि काही अत्यंत हास्यास्पद असल्याचं पाहायला मिळालं. असाच एक ई-पासचा अर्ज केरळ पोलिसांकडे आला आणि त्या अर्जाचं कारण पाहून पोलिस देखील हैराण झाले.

एका तरुणाने केरळ पोलिसांकडे चक्क सेक्स करायला जाण्यासाठी ई-पास मिळावा असा अर्ज केला आहे. सरकारतर्फे अत्यावश्यक कामासाठी किंवा वैद्यकीय कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यातच अशी फालतू कारणं देऊन लोक प्रवास करण्यासाठी पासला अर्ज करत असल्याने पोलीसही हैराण झाले आहेत.

संबंधित तरुणाने सेक्स करण्यासाठी घराबाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी मला ई-पास मिळावा असा अर्ज पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन केल्यानंतर पोलिसांनी तो अर्ज करणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आणि त्याला पोलीस ठाण्यात आणलं. त्यानंतर त्या तरुणाने सर्वांची जाहीर माफी मागितली व पुन्हा असं होणार नाही, असं देखील पोलिसांना सांगितलं. पण अशा खोट्या आणि शुल्लक कारणाने लोक ई-पासला अर्ज करत असल्याने खरंच अत्यावश्यक काम असलेल्या नागरिकांचे ई पास प्रलंबित राहत आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘शरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला’; शिवसेना आमदाराची टीका

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; वाचा सविस्तर…

घरात विलगीकरणासाठी जागा नाही; तरूणाने 11 दिवस झाडावर काढले

परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना बलात्कार

“क्रिकेटपेक्षा शेतीच बरी, टीममध्ये कोचला महत्व नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More