Top News राजकारण

मला आता आरामाची गरज आहे; कमलनाथ यांचं मोठं विधान

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशात सरकार गमावल्यावर त्याचप्रमाणे पोटनिवडणूकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक मोठं विधान केलंय. मला आता आराम हवं असल्याचं वक्तव्य कमलनाथ यांनी केलंय.

छिंदवाडामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कमलनाथ बोलत होते. या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे कमलनाथ यांनी राजकारणाला ‘रामराम’ करण्याचे संकेत दिले असल्याचं म्हटलं जातंय.

कमलनाथ म्हणाले, “मला आता आरामाची गरज आहे. आतापर्यंत मी खूप प्रगती केली आहे.” कमलनाथ केवळ राजकीय पदचं नव्हे तर राजकारणातूनच संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चाही रंगल्यात.

जर कमलनाथ यांनी राजकीय संन्यास घेतला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित!

कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पदड्याआड- अजित पवार

धक्कादायक! समुद्रकिनारी प्राचीन वस्तु म्हणून आणली घरी पण घडलं विचित्रच

ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमध्ये महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या