बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

मुंबई | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. रामदास आठवले हे राष्ट्रपती व्हावेत, असं सीमा आठवले यांनी म्हटलंय.

रामदास आठवले हे सध्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते ज्यावेळी राज्यमंत्री झाले, त्यावेळी आम्हाला आनंदच झाला होता. पण, आता ते कॅबिनेट मंत्री व्हावेत आणि पुढील 10 ते 15 वर्षात ते राष्ट्रपती व्हावेत ही माझी अंत:करणापासूनची इच्छा आहे, असं सीमा आठवले म्हणाल्यात.

राष्ट्रपती हे आपल्या देशातील सर्वोच्च स्थान असलेलं पद आहे, असं आठवलेंच्या पत्नी सीमा यांनी म्हटलं आहे. त्या एका डिजिटल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

रामदास आठवले यांचे जगभरात फॉलोवर्स आहेत, काहीजण त्यांच्या कवितांचा विपर्यास करतात, विनोद करतात. पण, आम्हाला तसं वाटत नाही. ते कुठलाही विषय नसताना कवित करू शकतात, ते एक शीघ्र कवी आहेत, असं म्हणत सीमा आठवले यांनी रामदास आठवलेंच्या कवितांचं कौुतक केलंय.

थोडक्यात बातम्या- 

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल”

घरात पूजा करताना जळत्या कापरामुळे लुंगीने पेट घेतला; मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा मृत्यू

कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका?; ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

“मुख्यमंत्र्यांना तीन पत्र लिहिली, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

‘…तोपर्यंतच आम्ही विरोधात बसणार आहोत’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More