बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी जास्तच रोमॅन्टिक, मला 3-4 मुलांची आई व्हायचंय’; या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची इच्छा!

मुंबई | बॉलिवूडमधील अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्याला 3-4 मुलं हवी असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना तिने मुलांबाबत माहिती दिली. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती बोलत होती. या मुलाखतीवेळी तिने लग्नाबद्दल आणि कोरोनानंतर सेेटवर कशा प्रकार वातावरण असतं याबाबत तिने दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

लग्नाबाबत मी काही ठरवलं आणि काही विचार केले आहेत. त्या विचारांशी मी कधीही तडजोड करणार नाही. जर मला माझ्या आवडीचा जोडीदार मिळाला तरच मी लग्न करणार असल्याचं भूमी म्हणाली. त्यासोबतच मी खूप रोमॅन्टिक असून मला मी लग्नावर विश्वास ठेवते आणि मला वाटतं माझी 3 ते 4 मुलं असावीत, असंही भूमी पेडणेकरने सांगितलं.

जेव्हा मी शुटींगमधून वेळ काढते तेव्हा मला कुटुंबासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. मी घरात माझ्या आईला बॉस मानते, असं भूमीने सांगितलं. भूमीला त्याच्या क्रशबद्दल विचारलं तेव्हा तिन ऋतिक रोशन, शाहरूख खान, शाहीद कपूर आणि आमीर खानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.

दरम्यान, कोरोनानंतर सेटवरच्या वातावरणाबद्दल बोलताना भूमी म्हणाली, पूर्वीसारखं लोकं एकत्र जेवत नाहीत. तोंडाला मास्क लावून काम करत असल्याचं भूमी म्हणाली. त्यासोबतच कोरोना झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर पहिल्यासारखा ग्लो राहिला नाही आणि केस गळायला लागल्याचं भूमीने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! संजय राठोडांना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात मिळाली क्लिन चीट

बैलगाडा शर्यतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More