“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी

नवी दिल्ली | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा विवाह काही दिवसांपूर्वी संपन्न झाला होता. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत असतानाच निकने “मला बाबा व्हायचंय” अशी ईच्छा व्यक्त केली आहे. 

मला लहान मुलं खूप आवडतात, त्यामुळे माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यात एखादे लहान मूल आले तर आम्हाला नक्कीच आवडेल, असे निक जोनासने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

आयुष्यात मी अनेक चढउतार पाहिले आहेत. जीवनाने मला कमी वयात खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत. असंही तो या मुलाखतीत म्हणाला.

दरम्यान, मला आयुष्यात जे काही अनुभव आले ते मला माझ्या मुलासोबत शेअर करायला नक्कीच आवडतील, असंही तो त्यावेळी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

-जेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात!

-हॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल

-मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’

-IND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी

-अटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार