“मला कोहली आणि रोहितकडून फटकेबाजी शिकायचीय”; भारतीय संघातील ‘या’ मोठ्या खेळाडूचं वक्तव्य
मुंबई | भारतीय कसोटी संघाचा सर्वात चिवट खेळाडू म्हणून चेतेश्वर पुजाराला ओळखलं जातं. पुजारा मैदानात उतरला तर तो मोठमोठ्या गोलंदाजांचा घाम काढतो. आंतरराष्ट्रीय गोलंदाजांकडुन देखील पुजारा लवकर बाद होत नाही. राहुल द्रविड नंतर भारतीय क्रिकेट संघाचा तो ‘द लिटल वॉल’ आहे, असं क्रिकेट वर्तुळात मानलं जातं. त्यातच पुजाराने त्याच्या शैली विरुद्ध जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या पुजाराने आक्रमक फटकेबाजी शिकण्याची इच्छा प्रकट केली आहे. रोहित आणि विराटकडून टी-20 क्रिकेटला साजेशी खेळी करण्याची इच्छा आहे, असं पुजारा म्हणाला. मी धडाकेबाज फलंदाज नाही. परंतू विराट आणि रोहितकडुन शिकण्यासारखं खूप काही आहे. टी-20 मध्ये फटकेबाजी करण्यासाठी टायमिंग महत्वाची असते. माझ्यामते या दोघांना ते चांगलचं जमतं, असं पुजारा म्हणाला.
मागील अनेक वर्षांपासून पुजारा आयपीएल खेळत नव्हता.त्याची खेळण्याची शैली कसोटी सामन्यात खेळण्याजोगी आहे. त्यामुळे आयपीएलच्या फ्राँच्याईजींनी पुजारावर बोली लावली नाही. परंतु यावर्षी त्याला चेन्नई सुपर किंग्स संघाने लिलावात 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे आणि त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्याला त्याच्या शैलीच्या विरुद्ध जाऊन फटकेबाजी करावी लागेल.
दरम्यान, चेन्नईचा संघ मागील वर्षी चांगली कामगिरी करू शकला नाही. संघात युवा खेळाडूंची कमतरता आहे अशी वारंवार टीका केली जात आहे. या आयपीएल हंगामाच्या लिलावात चेन्नईला अपेक्षेप्रमाणे खेळाडू भेटू शकले नाही. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात संघ कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून पतीनेच घराला लावली आग, पत्नी आणि मुलांचा मृत्यू
गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कोरोना लसीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी
50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी
“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.