बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय”

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयानं रविवारी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीचं उदाहरण देत एक इच्छा व्यक्त केली. विम्बल्डनच्या अंतिम लढतीच्या वेळी तिथल्या क्रिडा रसिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सर्व प्रेक्षक सेंटर कोर्टवर विनामास्क होते. त्या लढतीचा आनंद प्रेक्षक विनामास्क घेत होते.

अंतिम लढतीच्या वेळी सेंटर कोर्टवर उपस्थित एकाही प्रेक्षकानं मास्क घातलं नव्हतं. ही गोष्ट न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उच्च न्यायालयानं एक इच्छा व्यक्त केली.

असाच आनंद आपल्या भारतातल्या लोकांच्या चेहऱ्यावर बघायचा आहे. इंग्लंडप्रमाणे भारतातही लोकांना मास्कशिवाय फिरताना बघायचंय, असं मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी म्हटलं आहे. भारतात विनामास्कची वेळ कधी येणार? भारतातील नागरिक पुन्हा कधी सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगणार? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. त्यावर सर्व नागरिकांचे लसीकरण ही त्यामागची एकमेव गुरुकिल्ली असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील काही भागात अद्यापही कोरोनाचा प्रभाव कायम आहे. मात्र देशातील बहुतांश राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी  बाहेर पडत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हा प्रकार पोषक असून त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक बळावत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

अनिल देशमुख यांच्यानंतर आता सुपुत्र ‘सलिल देशमुख’ ईडीच्या रडारवर?

“लक्षात ठेवा, आम्हाला डिवचल्यास बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही”

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणेंचं निधन

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More