बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्याकडून 50 रुग्णावाहिका पाठवू इच्छितो”; पाकिस्तानचं पंतप्रधान मोदींना पत्र 

नवी दिल्ली |  सलग तीन दिवसांपासून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखांवर जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम दिसून येत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. यातच, भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकिस्ताननं भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

पाकिस्तानमधील एका संस्थेनं भारताला 50 रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शवली असून, यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. एधी फाऊंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं असल्याची माहिती मिळाली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. फैजल एधी, एधी फाऊंडेशनचे कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो असं या पत्रात नमूद केलं आहे.

आताची परिस्थिती गंभीर आहे, याची आम्हाला जाणीव असल्यानच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, असं या पत्रात लिहलं आहे. तुमच्या नियोजनात आमची अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळे आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णावाहिकांसोबत आम्ही स्वयंसेवकांची टीमही पाठवू. आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीच नको. आम्ही आमचं इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू, असं या पत्रात सांगितलं आहे.

दरम्यान, आम्ही भारतातील करोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. करोना आणि त्याचा भारतीय नागरिकांवर होणारा परिणाम याकडं आमचं सातत्यानं लक्ष आहे. या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये 50 रुग्णावाहिका पाठवू इच्छितो. रुग्णावाहिकांसोबतच त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

 

 

Photo Credit – Social Media

 

थोडक्यात बातम्या

आधी पत्नी-मुलीला संपवलं त्यानंतर घरी आलेल्या शिक्षिकेसोबत… अत्यंत धक्कादायक प्रकार

कुठं बेड मिळेना, दुर्दैवी पत्नी पतीला तोंडाने श्वास देत राहिली मात्र…

कोरोनाग्रस्तांना बेडसाठी भरत जाधवची आयडियाची कल्पना, “हीच ती वेळ आपले कर्तव्य बजावण्याची”

संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

‘आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना’; लसीसाठी लागणारा कच्चा माल न देण्यावर अमेरिका ठाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More