बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलगी हवी होती, मुलगा झाला; रागाच्या तडाख्यात दगडावर आपटून हैवान बापाकडून मुलाची हत्या!

नागपूर | नागपूर येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अनेक ठिकाणी वंशाचा दिवा हवा असतो. मात्र नागपूर येथे एका व्यक्तीला वंशाची पणती हवी होती. यादरम्यान संबंधित व्यक्तीला मुलगा झाल्याने अत्यंत क्रूरपणे त्या चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे.

संबंधित आरोपीचं नाव भजन कौरती असं आहे तर मृत झालेल्या चिमुकल्याचं सत्यम कौरती असं आहे. भजन कौरती यांना कन्या हवी होती. मात्र त्यांना वंशाचा दिवा झाला. याच रागातून भजन यांचं त्यांच्या पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर भांडणाच्या रागात भजन यांनी आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला दगडावर आपटून त्याचा जीव घेतला.

या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी येथे घडली आहे. या घटनेनंतर संबंधित आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. संबंधित चिमुकलीच्या आईने आपला मुलगा तर गमवलाच सोबतच पतीलाही तुरुंगात पाहावं लागत आहे.

दरम्यान, अनेकदा अशा घटना समोर येतात की वंशाचा दिवा जन्माला यावा म्हणून लोकं उपासतापास, होमहवन करतात. इतकंच काय अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नरबळी देखील देतात. आपल्या पत्नीला किंवा सुनेला मुलगा झाला नाही फक्त मुलीच झाल्या म्हणून तिचा छळ करणारे देखील कमी नाहीत.

थोडक्यात बातम्या- 

लॉकडाऊनचं काय करायचं?; कॅबिनेट मंत्र्यांनाच कळेना,कुणी म्हणतंय वाढवावा, कुणी म्हणतंय नको!

शरद पवारांचे सरकारला पुर्ण आशिर्वाद, हे सरकार 5 वर्ष चालेल- संजय राऊत

“मृतदेहांवरून राजकारण कसं करावं हे माणसातील गिधाडांकडून शिकावं”

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

“सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More