बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गाडीत असताना उद्घाटन न करताच निघून जावं वाटलं पण…’ अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

पुणे | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. अशातच कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी गर्दीवर दिलगिरी व्यक्त केली.

यावेळी मंचावर बोलताना अजित पवार यांनी या गर्दी प्रकरणावर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त केली आहे. ॲक्शन घ्यायला सांगतो! असंही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं, असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रसादला सांगितलं होतं की, अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की, धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं अजितदादांनी म्हटलं.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय की, अजितदादांची मनापासून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमाला येण्याआधी सकाळीच उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. कडक कार्यवाही करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र, खुद्द अजितदादांच्या कार्यक्रमातच हा गोंधळ पाहायला मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुंबईत दररोज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट, कोरोनामुक्तीचा दर वाढला

लाॅकडाऊन उघडताना काळजी घ्या; केंद्राची राज्यांना ‘ही’ महत्वाची सूचना

‘अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही’; दादरच्या राड्यावर ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध मीच देणार आहे”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More