मीही शरद पवारांना भेटणार होतो- दीपक केसरकर

सिंधुदुर्ग | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आता पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही शरद पवारांना भेटणार होतो, असं म्हटलं आहे. 

शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांची भेट घेणार होतो, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राजकीय मतभेद असले तरी आदरातिथ्य करणे गरजेचे आहे. त्यांना फोन करुन मी भेटण्याविषयी बोललो होतो; मात्र अचानक मुंबईत मिटींग असल्यामुळे भेटू शकलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, मुंबईत जाऊन जिल्ह्यातील काजू प्रश्‍नासंदर्भात त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-दलित-आदिवासी नव्हे, हनुमान तर जैन होते; जैन मुनींचा दावा

-पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या

-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी

-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार

-बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड