बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“होय, मी 15 ते 28 फेब्रुवारीदरम्यान मुंबईत होम क्वारंटाईन होतो”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर भाष्य करत त्यात काही तथ्य नसल्याचं सांगितलं होतं.

सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी यावेळी केला. गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे रुग्णालयात आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं परमबीर सिंह कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवालही शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.

त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या नागपूर ते मुंबई विमानप्रवास केल्याचा एक पुरावा समोर आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसून येत असताना त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या प्रकरणात स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

दिवसेंदिवस या प्रकरणात अनेक नवनव्या गोष्टींचा उलगडा होताना पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी मी नागपूर ते मुंबई विमानप्रवास केल्याचं कबुल केलं आहे. तसेच रूग्णालयातुन सुटी मिळाल्यानंतर आपण लगेचच चार्टर्ड विमानाने मुंबईला आलो आणि आयसोलेशनमध्ये गेलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सध्या समाजमाध्यमावर फिरत असलेलं ते डाॅक्युमेंट खोटं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.  पुढे या प्रकरणात आणखी किती गोष्टींचा उलगडा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडिओ – 

थोडक्यात बातम्या – 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना मोठा झटका!

लेकीने वडिलांना हॉटेलमध्ये दारु पाजली, जेवू घातलं अन् नंतर जाळून टाकलं; कारण ऐकून पोलिसही हादरले

महाराष्ट्रातील घडामोडींमुळे काँग्रेस नाहक बदनाम; हायकमांड घेणार निर्णय!

सचिन वाझेंनी वापरलेली आणखी एक महागडी गाडी जप्त, ‘या’ कारणामुळे ही गाडी महत्त्वाची?

…म्हणून पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी क्षमा मागितली!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More