बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला VIP गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं’, ‘त्या’ बड्या अभिनेत्याच्या मुलाचा खुलासा

मुंबई | नुकतंच शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. या पार्टीत ड्रग्स घेणाऱ्यांना अटक केली आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाईत बाॅलिवूडच्या बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. या बड्या अभिनेत्याचं नाव शाहरुख खान असून त्याच्या मुलाला या धाडीतून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

आता एनसीबी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीत मला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं. त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती. तसेच माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं, असं आर्यननं चौकशीत म्हटलं आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीचं पथक या क्रूझवर पोहोचलं. मात्र ही क्रूझ समुद्राच्या मध्यमागी पोहोचल्यानंतर क्रूझवर ड्रग्स पार्टी सुरू झाली. या पार्टीत उपस्थित लोक खुलेआम ड्रग्सचे सेवन करत होते. त्यानंतर एनसीबीच्या पथकानं कारवाई सुरू केली.

दरम्यान, या पार्टीत प्रवेशासाठी प्रत्येक व्यक्तीनं 80 हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. अजून एनसीबीनं कोणालाही अटक केली नसल्याचं संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील दोन-तीन दिवस पाऊस झोडपून काढणार

‘महेश मांजरेकर कोण आहेत?’; जितेंद्र आव्हाड संतापले

एनसीबीची आणखी एक मोठी धाड; रेव्ह पार्टीतून अभिनेत्याच्या मुलासह 10 जण ताब्यात

“विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज”

‘…तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More