बीड | महिला बालकल्याण आणि ग्रामविकास खाते मिळाले तेव्हा मी खूश नव्हते, असा खुलासा महिला बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. बीडमधील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मनासारखं खातं मिळाल नसतानाही मी त्यामध्ये मनापासून काम केलं, ते खातं नावारुपाला आणलं, त्यामुळे प्रत्येकवेळी मनासारखं घडत नाही, जे काम मिळेल ते मनापासून केलं तर समाधान मिळते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, याआधीही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं बोलून त्यांनी वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतली होती. आता त्यांचं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-‘दबंग 3’ नको रे बाबा ; सलमानला चाहत्यांचा सल्ला
-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!
-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी
-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!
-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???