बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज कुंद्राने माझ्याकडून अंगप्रदर्शन करून घेतलं आणि…’; शार्लिन चौप्राचा गंभीर आरोप

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणात अभिनेत्री शार्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंंतर आता शार्लिन चौप्राने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी माझा लौंगिक छळ केला आणि माझी फसवणूक केली, अशी तक्रार शार्लिन चौप्राने दाखल केली आहे. राज कुंद्राने माझ्याकडून अंगप्रदर्शन करून घेतलं आणि नंतर पैसे देखील दिले नाहीत, असा आरोप देखील शार्लिनने केला आहे.

आपले संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचं सांगून त्याने मला धमकावलं, असंही शार्लिन म्हणाली आहे. शार्लिनने केलेल्या गंभीर आरोपमुळे आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी पुन्हा चर्चाचा विषय ठरताना दिसत आहे.

दरम्यान, शार्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर एक करार झाला होता. हा करार भारताबाहेरील काही कंपन्यांसाठी अश्लील कंटेक्ट देण्यासंबंधीत होता, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता शार्लिनने राज आणि शिल्पावर गंभीर आरोप केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

फडणवीस-मुंडे वाद पुन्हा शिगेला???; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांनी सोडली पत्रकार परिषद

…जेव्हा ‘द वाॅल’ म्हणतो, “तो माझ्यासाठी काही अभिमानाचा क्षण नव्हता”

पुढील 48 तास धोधो पाऊस; ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘मलिकांना मिरच्या का झोंबल्यात?…’ नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेलांचं प्रत्युत्तर

अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भुमिका निभावलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More