मुंबई | दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला, असं भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी सांगितलं आहे.
रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे. हेगडे यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात पत्र लिहून सविस्तर माहिती दिली आहे.
आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे, असं हेगडेंनी सांगितलं.
2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा आरोप कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर केलाय.
थोडक्यात बातम्या-
धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही तक्रार का देताय?, हेगडे म्हणाले…
“धनंजय मुंडेंवर माझा विश्वास ते स्वत:च राजीनामा देतील”
“माहिती लपविणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे”
मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; रेणू शर्माविरोधात तक्रार करण्यासाठी ‘हा’ भाजप नेता पोलिस स्थानकात