बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतात बसून अंग मोडून आलं होतं, ती खास विमानंसुद्धा धूळखात पडून होती”

मुंबई | नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या आगळ्या-वेगळ्या अंदाजाने नागरिकांचं लक्ष्य आपल्याकडं खेचून घेतात. मोदी आपल्या फोटोंमुळे कायम चर्चेत असतात. आताही मोदी ज्या बोईंग विमानानं अमेरिकेला गेले आहेत. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

पंतप्रधान मोदी सुमारे 8 हजार रूपये किमतीच्या बोईंग 777 विमानानं दौऱ्यावर गेले आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरून मोदी यांना चांगलंच घेरलं आहे. राज्याचे विजपुरवठा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शेलक्या शब्दात मोदींवर टीका केली आहे. मोदींची आणि मोदींच्या विमानाची खिल्ली उडवली आहे.

भारतात बसून अंग मोडून आलं होतं, ती खास विमानं सुद्धा धुळ खात पडली होती. ते काल अमेरिकेला गेले. या शब्दात नितीन राऊत यांनी मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी दौऱ्यादरम्यान सुद्धा फोटो काढत तो सोशल मिडीयावर टाकलेला आहे. काँग्रेस मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना फक्त फोटो काढण्यासाठी गेल्याचं म्हटंल आहे. नितीन राऊत यांच्या या टीकेनंतर राज्यातील भाजप नेत्यांकडून राऊत यांचा समाचार घेतला जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

‘या’ योजनेतून मुलीच्या नावानं गुंतवणूक करा, मुदत संपताच मिळतील 65 लाख रूपये

फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे महाविकास आघाडी बाहेर काढणार!

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

“महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More