बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाॅलिवूड चित्रपटांमध्ये माझा फक्त फर्निचरसारखा वापर केला”

मुंबई | मनोरंजन विश्वाला एक मायानगरी म्हटलं जातं. दरदिवशी अनेक लोक या मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. यातील काही लोक यशाच्या शिखरावर पोहोचतात तर काही लोकांच्या नशिबी फक्त निराशा येते. बॉलिवूड इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावून देखील सध्या संघर्षाला सामोरं जाव लागत असणाऱ्या अभिनेत्री रिमी सेनने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

रिमी सेनने अगदी कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 10-11 हिट चित्रपट दिल्यानंतर रिमीने बॉलिवूड इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. रिमीनं नुकतीच एका वाहिणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत रिमीने बॉलिवूड मधील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. धूम, हंगामा यांसारख्या चित्रपटांमध्ये मला फर्निचरसारख्या भूमिका कराव्या लागल्याचं रिमीने म्हटलं आहे.

यावेळी बोलताना रिमी म्हणाली की, इंडस्ट्रीत असताना मला जे काही मिळालं ते माझ्या वाट्याचं नव्हतं. मी खूप सारे म्युझिक व्हिडीओ केले आहेत. मी अमिर खानसोबत एक जाहिरात देखील केली आहे. यानंतर मी हंगामा हा चित्रपट स्विकारला तो माझ्या नशिबाचा एक भाग होता, असंही रिमी म्हणाली आहे.

तसेच मला फक्त विनोदी चित्रपटच मिळत गेले. परंतु त्यामध्ये माझी भूमिका फक्त फर्निचरसारखी होती. त्यावेळी चित्रपटसृष्टी पुरुषप्रधान होती. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सर्वकाही बदललं आहे, असं देखील रिमी सेनने यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“शरद पवार आमचे नेते नाहीत, आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड”

‘भविष्यातही कोरोना महामारीपासून सुटका नाहीच’; गगनदीप कांग यांचं मोठं वक्तव्य

मराठवाड्यातील नद्यांना महापुराचा धोका; मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली पिकं संकटात

किचनमध्ये काम करताना अचानक महिलेच्या केसांनी घेतला पेट अन्…; पाहा व्हिडीओ

पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याचा पाणीप्रश्न सुटला, मुळशी धरणातून ‘इतके’ TMC पाणी मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More