बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी आणखी 25 वर्षे तरी राजकारणात राहणार- देवेंद्र फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनात राजकीय संन्यास घेण्याबाबत असल्याचं म्हटलं होतं. मात्र या वक्तव्यावर फडणवीसांनी आता सारवासारव केल्याचं पाहायला मिळत आहे.

आज देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या मुद्द्यावरुन फडणवीसांना छेडलं. त्यावेळी आपण पुढील 25 वर्षे तरी राजकारण आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

या पुढे मी 25 वर्षे राजकारण करणार आहे. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ती विचारपूर्वक बोलतो. मलाही माहीत आहे की, संन्यास घ्यायची गरजच पडणार नाही. कारण जे करण्यासारखं आहे ते हे लोक करतच नाहीये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विचारपूर्वक बोललो. जे करता येण्यासारखं आहे ते करत नाही म्हणून मी तो विषय बोललो. विचारपूर्वक बोललो. आणि हे खरचं आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला सर्वांची गरज आहे. माझी गरज आहे, त्यांची गरज आहे. यांची गरज आहे. राजकारण एकाच पक्षाचं नसतं. राजकारणात पक्ष पाहिजे, विरोधक पाहिजे. सर्व पक्षाचे लोकं पाहिजे. ठिक आहे. त्यांच्या शुभेच्छा समजूया, असं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा’; अमित ठाकरे संतापले

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

आता पुण्यातील ‘या’ नव्या रेल्वे स्थानकावरून सुटणार स्वतंत्र रेल्वेगाड्या; 9 जुलैला सुटणार पहिली रेल्वे

मुंबईतील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत घट!

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More