बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला टाॅपलेस पंतप्रधान व्हायचंय’; तरूणीने व्यक्त केली अजब इच्छा

लंडन | पंतप्रधान आणि राष्ट्रपती ही देशातील सर्वोच्च पदं असतात. पंतप्रधान होणं हे देशातील अनेकांचं स्वप्न असतं. परिणामी काहीजण आपापली इच्छा बोलूण दाखवत असतात. इंग्लंडमध्ये सध्या बोरिस जाॅन्सन पंतप्रधान आहेत. गेल्या काही दिवसांपासून बोरिस जाॅन्सन विरूद्ध लोकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अशातच एका तरूणीच्या अजब वक्तव्यानं सध्या इंग्लंडमध्ये खळबळ उडाली आहे.

लाॅरा एमहर्स्ट नावाची तरूणी इंग्लंडमध्ये राज्यशास्त्राचं शिक्षण घेते. राजकारणाची आवड असणारी लाॅरा ही आपल्या बिनधास्त वागणूकीसाठी प्रसिद्ध आहे. मी इंग्लंडची टाॅपलेस पंतप्रधान बनणार आहे, असं वक्तव्य लाॅरानं केलं आहे. लाॅरा ही अनेकदा पर्यावरण आंदोलनात सहभागी झाली आहे. तिनं अनेकदा टाॅपलेस होत पर्यावरणासाठी आंदोलनं केली आहेत.

लाॅराच्या मते, सध्याचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन योग्य काम करत नाहीत. बोरिस जाॅन्सन यांच्यापेक्षा तिला राजकारण जास्त कळतं असंही लाॅरा म्हणाली आहे. लाॅरा सध्या पदवीच्या अंतिम वर्षाला आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती म्हणून लाॅरा प्रसिद्ध आहे. लाॅराच्या या टाॅपलेस पंतप्रधान होण्याच्या वक्तव्यानं इंग्लंडमधील वातावरण चांगलच पेटलेलं आहे.

दरम्यान, लाॅराला अनेकदा इंग्लंडच्या रस्त्यावर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करताना पाहिलं गेलं आहे. पुढे चालून इंग्लंडच्या राजकारणात पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं लाॅरा म्हणाली आहे.

थोडक्यात बातम्या 

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं पुण्यात जल्लोषात स्वागत; पाहा व्हिडीओ

“बाळासाहेब ठाकरे खरे हिंदूवादी, राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते”

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

…यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More