बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी 10 हजारांची फौज घेऊन येईन, एका फटक्यात सरळ करेन’; शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात राहणाऱ्या वाघ कुटूंबावर 19 जून रोजी हल्ला झाला होता. धाकवत चितोडा येथे राहणाऱ्या गावगुंड रमेश हिवराळे याने अॅट्राॅसिटीचा धाक दाखवत गावात उच्छाद मांडला होता. गावगुंडांच्या त्रास होत असल्यानं बुधवारी चितोडा गावाला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची व्यथा आमदारांसमोर मांडली.

हल्ला झालेल्या वाघ कुटूंबासोबत आम्ही आहोत. घाबरण्याची गरज नाही, अशा शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी वाघ कुटूंबाला धीर दिला. त्यानंतर सांत्वन करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपणच ठेचा. सगळी शस्त्र अस्त्र, सर्व ताकद पुरवीन, असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

अॅट्राॅसिटी कायद्याचा कुणी धाक दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना संघटित होऊन उत्तर द्या, असं म्हणत त्यांनी थेट मातोश्रीवरून आदेश आल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या शिवसेना स्टाईल धडाकेबाज वक्तव्यानं त्यांचं काही ठिकाणी कौतुक देखील केलं जात आहे.

दरम्यान, अॅट्राॅसिटी हा कायदा रक्षणाकरिता आहे. मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करता येथे केला जातो. अॅट्राॅसिटीचा धाक दाखवून पैसे उकळले जातात. अवैध धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. एक विशिष्ट समाज कमी संख्येनं असल्यानं आणि संघटित नसल्यानं इथं वारंवार हल्ले होतात, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली; देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?

“सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीवर निवडणुका हा खात्रीशील इलाज नाही”

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ; ईडीनं बजावला नव्यानं समन्स

वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे घालून दिला नवा आदर्श; आईची अस्थी शेतात पसरवली

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More