बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मी पुन्हा येईन’; भर कार्यक्रमात संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई | 2019 च्या निवडणूकीत एक वेगळीच चुरस निर्माण झाली होती. शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणूका लढवल्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईल’चा नारा दिला होता. सेना भाजपला बहुमत मिळून देखील त्यांना सत्ता हाती घेता आली नाही. राज्यात नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. पण त्यानंतर देखील देवेंद्र फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईल’चा नारा चांगलाच गाजला होता. आता याच नाऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

पुण्यातील म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी, ‘मी पुन्हा येईन. जर तुमच्या गावाचा समावेश महापालिकेत झाला तर येत्या निवडणुकीत आपल्याला आपले चार नगरसेवक निवडणून आणायचे आहेत. मी पुन्हा येईल. मी दिल्लीत असलो तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईल, असं राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला.

सध्या पुणे महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. तर लवकरच 23 गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरला आहे. राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्लाही संजय राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

दरम्यान, काल शिवसेना भवनात सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणूकांसाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. युती आघाडी नंतर बघू आधी शिवसेना पक्षाला मजबुत करण्यासाठी तयारी सुरू करा, असं उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सागितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीला ‘आनंद पोटात मायेना’; शेअर केली खास पोस्ट!

देशात कोरोनाची तिसरी लाट???; या राज्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या 12,000 ने वाढली!

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

नवनीत राणांना आवरला नाही कैऱ्या खाण्याचा मोह, पाहा नेमका काय किस्सा घडला!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More