“मी येऊन अमृता वहिनींना सांगणार की…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी अमृता फडणवीसांचं(Amruta Fadnvis) नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना टोला लगावला आहे.

रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारावरून पवारांनी फडणवीसांना सुनावलं आहे. या मुद्द्यावरून भाषण करताना अजित पवार म्हणाले की, भाजपला महिलांची मत मिळाली आहेत, परंतु सहा महिन्यात त्यांना एक महिला मिळेना मंत्री करायला, हा कुठला कारभार आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे की, बघा त्यांच्याकडं रात्री. कारण त्यांनी मनावर घेतलं तर लगेच एखादी महिला मंत्री होईल, याची मला खात्री आहे, असा टोला त्यांनी फडणवीसांना भाषणादरम्यान लगावला.

देवेंद्रजींना काही विचारलं तर म्हणतात शिंदेंची परवानगी आणा आणि मुख्यमंत्र्यांना विचारलं की म्हणतात देवेंद्रजींनी सांगितलं की मी केलं, अशी नुसती टोलवाटोलवी सुरू आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री एकनाश शिंदे अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावरूनही अजित पवारांनी फडणवीसांना टोला लगावला होता .

महत्वाच्या बातम्या-