‘गनिमी काव्या’ने शबरीमलाला परत येऊ; तृप्ती देसाईंचा इशारा

कोची | भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शबरीमला मंदिर प्रवेशाचं आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे त्या पुण्याला परत निघाल्या आहेत.

स्वामी अय्यप्पांचा खरा भक्त असा वागणार नाही. आम्ही दुःखी मनाने परत जात आहोत. मात्र आम्ही ‘गनिमी काव्या’ने शबरीमलाला परत येऊ, असा इशारा तृप्ती देसाईंनी दिला आहे.

पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं. पोलिसांसोबत शबरीमलापर्यंत गेलो असतो तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मात्र त्यासाठी आम्ही आलो नव्हतो, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, तृप्ती देसाईंच्या मंदिर प्रवेशाला विरोध करत लोकांनी विमानतळाबाहेरच निदर्शनं केली. त्यामुळे तब्बल 14 तास त्यांना विमानतळावर ताटकळत बसावं लागलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्याला एक नंबरचं शहर बनवणार; देवेंद्र फडणवीसांंचं आश्वासन

-बारामतीच्या न्यायालयाकडून राज ठाकरे यांना दिलासा!

-विरेंद्र सेहवागनं महिला क्रिकेटसंघाला दिला ‘हा’ कानमंत्र

-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!