नाशिक महाराष्ट्र

… तरीही रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढणार- अर्जुन खोतकर

नाशिक | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली तरी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जाहीर केलं आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

जालना लोकसभा मतदारसंघातून मी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजय मिळवणार, असं अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. 

रावसाहेब दानवे यांनी स्वपक्षातील लोकांबरोबर अनेकांशी शत्रुत्व घेतल्यानं खासदार संजय काकडे यांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव होणार आहे, असं अर्जुन खोतकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

दरम्यान, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी पराभूत होतील, असा अंदाज वर्तवला होता.

महत्वाच्या बातम्या-

आता मुख्यमंत्रीही लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णा हजारेंच्या लढ्याला मिळालं यश

लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला एक संधी द्या- अमित शहा

-राष्ट्रवादीची उमेदवारी उदयनराजेंना मिळणार; अजित पवारांनी दिले संकेत

-पंतप्रधान मोदी म्हणाले तुमचा मुलगा पबजी खेळतो का?

-“भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या