बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी मरेन पण माझ्या कुत्र्याला मरू देणार नाही’; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका माणसाचा आणि कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माणसांपेक्षा कुत्र्याला जास्त जीव लावला जातो, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मात्र हे म्हणणं खर असल्याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे अस म्हणता येईल.

प्राणीही आपल्या कुटुंबाचा भाग असतात. आपण त्यांना खूप जपत असतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका गरीब व्यक्तीने खाद्यांवर आपल्या कुत्र्याला बसवलं आहे. आणि त्याच्या तोंडावर मास्क लावला आहे.

या व्हिडीओमधील कुत्र्याच्या मालकाचं नाव लाल देवांगन असं आहे. एवढंच नाही तर या मालकाने आपल्या कुत्र्याला पुरु असं नाव दिलं आहे. संबंधित मालकाला तू मास्क नाही लावला, मात्र कुत्र्याला लावलास?,असा सवाल एका व्यक्तीने केला. यावर त्याचं उत्तर ऐकून अनेकजण भावुक झाले. मी मरेन पण कुत्र्याला नाही मरू देणार, ते माझं बाळ आहे. लहानपणापासून याचा सांभाळ केला आहे, असं उत्तर त्या व्यक्तीने दिलं आहे.

दरम्यान, या घटनेचा एका व्यक्तीने व्हिडीओ बनवून त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर अनेक जण हा व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

सिनेसृष्टीला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

‘लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो, पण…’; समोर आली ही महत्वाची माहिती

“…तर मग कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More