बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी अधिवेशनात पोलखोल करणार, भाजपचे नेते तोंड लपवून पळतील”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे नवाब मलिक यांच्या निशाण्यावर आहेत. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी आपला मोर्चा आता भाजपकडे वळवलेला दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावर आता नवाब मलिकांनी भाजपवर पलटवार केला आहे.

किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. सोमय्यांची धमकी केवळ पोकळ आहे. मीच अधिवेशनात आता पोलखोल करणार आहे. त्यावेळी भाजप नेते तोंड लवपून पळतील, असा गंभीर इशारा मलिकांनी भाजप नेत्यांना दिला आहे. येत्या अधिवेशनात मी पुराव्यानिशी भाजपचं भांडा फोड करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

काल मी ट्विट केलेला फोटो हा समीर वानखेडे यांच्या मेहुण्याचा आहे. जास्मिन वानखेडे यांच्या पतीचा आहे. त्यांचा आता घटोस्फोट झाला आहे. समीन वानखेडे हा जन्मानेच मुस्लीम आहे. त्याने धर्मांतर केलेलं नाही, त्याच्या वडिलांनी धर्मांतर केलं होतं, असंही मलिकांनी यावेळी सांगितलं आहे.

तुम्ही सात वर्ष मलिकांबाबत खोदत राहिलात. तुम्हाला काहीच सापडलं नाही. मी काहीच केलं नाही, त्याला तुम्ही तरी काय करणार? असंही मलिक म्हणाले. दलितांचे अधिकार हिसकावण्या व्यक्तीच्या मागे रामदास आठवले उभे आहेत, हे दुर्देवी असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या-

व्हायोलिनचा ‘स्वराधीन’ हरपला! ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

“छत्रपतींचा जयजयकार करायला लाज वाटते तो भंगारवाला आमच्यासाठी भंगारच”

न्यूझीलंडला नमवण्यासाठी विराटसेना सज्ज! दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ची लढाई

“मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतात मग माचीस, तेल, नोकऱ्या, पगार याचं काय?”

“मी छोटा पैलवान आहे, तुम्ही मला इतका सोपा समजू नका”

सकाळी ‘हे’ 4 पदार्थ खा; वजनही कमी होईल आणि होतील फायदेच फायदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More