बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन”

मुंबई | अभिनेते किरण माने हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात. ते नेहमीच बेधडकपणे आपलं मत मांडत असतात. अशातच ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’या मालिकेत किरण माने भूमिका साकारत आहे. मात्र आता त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. किरण माने घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे.

अभिनेते किरण माने यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. अशातच आता किरण माने यांनी मालिकेतून बाहेर काढण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणावर बोलू नका, लिहू नका असं म्हणणं अयोग्य आहे. याप्रकरणी कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे तसंच एखाद्या नेत्याबद्दल पोस्ट केली म्हणजे त्या पक्षाचा झाले असं होत नाही, असंही किरण माने यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

पालकांनो सावधान! लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या ‘इतक्या’ पटीने वाढली

“गोड बोलण्यासाठी तिळगूळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे”

पुढील 2-3 दिवस राज्यात थंडीचा जोर कायम, हवामान खात्याचा इशारा

मोठी बातमी! अजित पवारांच्या नावाने धमकीचा फोन, मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

Makar sankranti 2022: ओमिक्राॅनविरोधात रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी तिळाचे लाडू सेवन करा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More