बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कुठल्याही किंमतीत गुडघे टेकणार नाही’; पंजशीरमध्ये अहमद मसुदची तालिबान्यांना तगडी टक्कर

काबुल | अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्यात तालिबान यशस्वी झालं आहे. पण हा संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. कारण पंजशीर या प्रांतासाठी आता मोठी लढाई होणार असं दिसत आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील जवळ जवळ सर्व भागामध्ये आपल्या दहशतवाद्यांना तैनात केलं आहे. अहमद मसुद आणि अमरूल्लाह सालेह यांच्या प्रतिकाराने आता अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात अजून संघर्ष होत आहे.

अफगाणिस्तानवर आपल्या दहशतीने वर्चस्व मिळवण्याचा तालिबान प्रचंड प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला पंजशीर या महत्वाच्या प्रांतात खिळ बसली आहे. अफगाणिस्तानचं सरकार उलथवून त्या ठिकाणी आपली सत्ता आणि सरकार स्थापन करायला तालिबान उताविळ झालं आहे. पण त्यांना या गोष्टीसाठी आता संघर्ष करावा लागत आहे.

तालिबाननं अहमद मसुद यांना शरण येण्यासाठी 4 तासांचा अवधी दिला होता. पण या 4 तासात अहमद मसुद हे शरण आले नाहीत. तालिबानच्या म्हणण्यानुसार तलिबानने पंजशीरला सर्व बाजुंनी घेरलं आहे. तालिबान सध्या अहमद मसुद यांच्याशी चर्चा करत आहे. पण अहमद मसुद यांनी पंजशीर हा आपला प्रांत सोडण्यास सरळ नकार दिला आहे.

मी कोणत्याही परिस्थितीत पंजशीर सोडणार नाही. मी तालिबान सोबत लढत राहणार आम्ही तालिबान सोबत दोन हात करण्यासाठी तयार आहोत, असंही मसुद म्हणाले आहेत. आम्ही सोवियत युनियन समोर सुद्धा कधी गुडघे टेकले नाहीत ते या तालिबान समोर कधीचं शक्य नाही, असं म्हणत अहमद मसुद यांनी तालिबानला थेट आव्हान दिलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“पोरगं हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का?”

‘दोन आठवड्यात शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा’; सर्वोच्च न्यायालयाची सरकारला ताकीद

मुंबई कोरोनामुक्त होतंय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, काळजाचा थरकाप उडवणारी बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More