कुस्तीच्या आणि राजकारणाच्या दोन्ही मैदानात उदयनराजेंसोबत लढायला आवडेल!

सातारा | कुस्तीच्या आणि राजकारणाच्या दोन्ही मैदानात उदयनराजेंसोबत लढायला आवडेल, असं मत भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी व्यक्त केले. कुस्ती दंगल स्पर्धेसाठी पुरूषोत्तम जाधव यांनी सातारा जिल्हा संघाची मालकी घेतली आहे. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.

मागील वेळी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून मी तयारी केली होती. पण हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आला. मोदी लाटेत केवळ तिकिट न मिळाल्याने मी अपक्ष निवडणुक लढलो आणि अडीच लाख मते मिळविली.

दरम्यान, त्या वेळी माझे नशिब नव्हते. यावेळेस मला माझे नशिब साथ देईल, पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणुकीसाठी तयार आहे, असंही त्यांनी याेवळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राम मंदिराच्या विषयात आम्ही कोर्टालाही मानत नाही- संजय राऊत

-सत्तेत असूनही कामं होत नाहीत, भाजप नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

-रस्त्यावर मुरूम कधी टाकतात?…. तुकाराम मुंढेंच्या प्रश्नावर तरुण इंजिनिअर निरुत्तर

-आगामी निवडणुकीत मोदी की राहुल?; काय म्हणाले नारायण राणे…

-रविंद्र जडेजाची पत्नी करणी सेनेच्या अध्यक्षपदी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या