बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य; इथून पुढे शिस्त पाळणार- साध्वी प्रज्ञा

भोपाळ |  भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांना अखेर उपरती झाली आहे. आपण आता परत वादग्रस्त वक्तव्य करणार नाही, असं त्यांनी पक्षाच्या नोटीसीला उत्तर देताना म्हटलं आहे.

मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य आहे. कोणत्याही पक्षसंघटनेत शिस्त असायलाच हवी. मी त्या शिस्तीचे पूर्णपणे पालन करीन, असं साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

नथुराम गोडसे देशभक्त आहे आणि तो देशभक्तच राहणार, असं वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून भाजपचा निवडणूक काळात अडचणींचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, मला संधी मिळेल तेव्हा मी नक्की पंतप्रधान मोदींना भेटेल, असं त्या म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-उदयनराजे म्हणतात, सध्या देशात 1857च्या बंडासारखी परिस्थिती

-आज शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित दुष्काळ दौरा

-भाजपच्या चिन्हावर लढलो तर आमचं काय राहिलं मग…- रामदास आठवले

-सरकारच्या ‘या’ निर्णयाविरूद्ध इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

-भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून धुसपूस?? आदित्य ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More