बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध मीच देणार आहे”

मुंबई | आज शिवसेना पक्षाचा 55 वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मोलाचं मार्गदर्शन करण्याबरोबरंच चौफेर फटकेबाजी देखील केली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची झूल बाजूला ठेवून मी बोलत आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाला आहे. या नेत्यांना सत्तेची पोटदुखी झाली आहे. सत्ता नाही म्हणून त्यांचं पोट दुखत आहे. यांना मीच राजकीय औषध देणार आहे. मी 55 वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

प्रमोद नवलकर म्हणायचे त्याप्रमाणे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत. 23 जानेवारी शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस, 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे केले पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावर आमच्या हिंदुत्वावर, विचारांवर संशय घेतला जातो. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का?, असं विचारलं जातं. मला या लोकांना सांगायचं आहे की, हिंदुत्व हे काही नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘घरातून एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर…’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

“बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या”; ‘या’ मुख्यमंत्र्यांची महत्वाची मागणी

काय सांगता! पाण्याच्या टंचाईमुळे महाराष्ट्रातील ‘या’ कुटुंबाने घरातच खोदली विहीर

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

लग्नानंतर अनैतिक प्रेमसंबंध ठेवणं पडलं महागात; आता दोघींसोबत दिवस वाटुन राहावं लागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More