Top News महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले”

मुंबई | शेतकऱ्यांच्या कृषी आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन चालू आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संजय राऊतांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे त्यासोबतच, किसान आंदोलन झिंदाबाद, जय जवान जय किसान, असंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत गाझीपुर सीमेवर दुपारी 1 वाजता आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, संजय राऊतांच्या आणि शेतकरी आंदोलकांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“कुठलाही संकल्प नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसं म्हणायचं?”

“कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे यावरून अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?”

निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट, महाराष्ट्रासाठी काय?- आदित्य ठाकरे

संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा अर्थसंकल्प आहे- देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या