“मी कधीही खोटी कामं करणार नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मंगळवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांनी नागपूरमधील कथित NIT भूखंड गैरव्यवहार प्रकरण चांगलंच लावून धरलं. या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde) धारेवर धरत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे.

गंभीर आरोप झाल्यानंतर शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे विधानसभेत म्हणाले आहेत की, नागपूर न्यास प्रकरणात नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही गैरव्यवहार केला नाही.

एकनाथ शिंदे तुमच्यासारखे साडे तीनशे कोटी फुकट देत नसतात. ते धन दांडग्यांनाही पैसे देत नाही, असंही शिंदे म्हणाले आहेत. आपण नगरविकास मंत्री असताना हे सगळं झालं असून नव्यानं वाटप केले नसल्याचा दावाही शिंदेंनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे कधीही खोटं काम करणार नाही, असं त्यांनी आरोप करणाऱ्यांना सुनावलं आहे. तसेच ज्यांनी हे प्रकरण काढलं त्यांच्याकडं या प्रकरणाची संपूर्ण माहिती नसल्याचंही शिंदे म्हणाले आहेत.

आम्ही तुमच्यासारखे नाही, बिल्डरकडून 350 कोटी लुटून ते आम्ही कोणाच्या घशात घातले नाहीत, अशा शब्दांत शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-