Loading...

नारायण राणे म्हणतात, “तो पराभव मी कधीही विसरू शकत नाही”

मुंबई |  मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या माझ्यासारख्याला पाठीमागच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. तो पराभव मी कधीही विसरणार नाही, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.

नवख्या उमेदवाराने केलेला पराभव राणेंना आणखीही बोचत आहे. त्यांची हीच सल त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. मालवणमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. यावेळी राणेंनी आपल्या मनातील सल कार्यकर्त्यांना बोलून दाखवली.

Loading...

महाराष्ट्राच्या राजकारणात मी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालो. याच मतदारसंघातून मी 6 वेळा आमदार झालो. पण नवख्या वैभव नाईक यांनी मला पराभूत केलं. हा पराभव मी कधीही विसरू शकत नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, येणाऱ्या काळात मालवणला मागास ठेवायचे नसेल तर विधानसभा निवडणुकीत मला 80 ते 85 टक्के मतदान मिळालं पाहिजे, यासाठी कामाला लागा, असं राणे म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास!

-काश्मिरच्या लाल चौकात अमित शहा फडकवणार तिरंगा!

-शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती- रामदास फुटाणे

Loading...

-राट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्यदिन साजरा करणार

-सुषमाजींनी ‘प्रोटोकाॅल’ला ‘पीपल्स काॅल’मध्ये बदललं- नरेंद्र मोदी

Loading...