‘…हे पाहिल्यानंतर मी कधीही मास्क विसरणार नाही’; मुंबई पोलिसांनी दिलेल्या शिक्षेला आनंद महिंद्राही घाबरले
मुंबई | कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र, देशभरात सर्वाधिक कोरोना रूग्णांचा आकडा महाराष्ट्रात आढळून आला आहे. त्यात नागरीक नियमांचं काटेकोरपणे पालन करत नाही. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी अजब शक्कल लढवली आहे. मास्क न घालणाऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा द्यायचं त्यांनी ठरवलं आहे.
मुंबईत मागच्या 48 दिवसात तब्बल 85 हजार कोरोनाग्रस्तांची नोंदणी झाली आहे. देशभरात काही ठिकाणी आता कोरोनास्थिती हाताबाहेर जात असल्यानं लाॅकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. मात्र तरीही काही नागरीक कोरोना नियम डावलून मनमानी करतांना दिसत आहे. त्याच संदर्भात आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांना कोंबडा बनवून भर रस्त्यावर चालत जाण्याची शिक्षा केली आहे. हा व्हिडीओ मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील नियम मोडणाऱ्या नागरीकांचा आहे. प्रशासनाने नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र तरी काही जण याकडे डोळेझाक करत आहेत. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी ही शिक्षा पोलिसांद्वारे या बेजबाबदार नागरीकांना केली जात आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेली शिक्षा बघून मी तरी कधी मास्क विसरणार नाही. त्याचबरोबर हा व्हिडीओ मला सिग्नल अॅप वर मिळाला होता. हे बघून मला माझ्या बोर्डिंग शाळेची आठवण झाली होती. आमच्यासाठी ही शिक्षा फार सामान्य गोष्ट होती. मात्र त्यात फार थकून गेल्यासारखं व्हायचं. त्यामुळे मी तरी हा व्हिडीओ पाहिल्यावर मास्क घालायचं विसरणार नाही, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
“Face mask rule violators at Marine Drive in Mumbai being made to do a “Murga” walk as punishment by Mumbai Police” Received on my ‘SignalWonderbox.’ A common punishment in the boarding school I attended. Comical, but physically taxing.I certainly won’t forget my mask!! pic.twitter.com/GnVY6NfasV
— anand mahindra (@anandmahindra) March 30, 2021
थोडक्यात बातम्या –
“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”
“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”
उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे
आमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.