बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही, मी जिंकले नाही तर…”

कोलकत्ता | पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

निवडणुक प्रचारदरम्यान, मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री बनेल असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलं आहे. तसेच यावेळी मला मत द्या नाहीतर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री बनेल, तुमचं प्रत्येक मत माझ्यासाठी मौल्यवान असल्याचं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

आपण लोकांचे तारणहार असल्याचं प्रचारावेळी बॅनर्जींनी म्हटलं आहे. तसेच नंदीग्राममध्ये निवडणूक लढण्यास सांगितल्यावर मी शेतकरी आंदोलनासाठी लढले. मात्र माझा पराभव का झाला हे सर्वांना माहित असून हे प्रकरण न्यायालयात गेलं असल्याचं देखील त्या म्हणल्या.

दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक वक्तव्य केलं असून मी मोदी-शहा यांना दादा म्हणेल, हा शिष्टाचार आहे. मात्र देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही. त्यामुळे आपली मत वाया न घालवता ती मला द्यावी असं देखील ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

‘या’ योजनेतून मुलीच्या नावानं गुंतवणूक करा, मुदत संपताच मिळतील 65 लाख रूपये

फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे महाविकास आघाडी बाहेर काढणार!

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More